गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (08:03 IST)

वाचा,रात्रीच्या कर्फ्यूबाबत केंद्रीय पथकाने काय सांगितले

Read what the central team said about the night curfew Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
देशात केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी दोन्ही राज्यांची सरकारे निर्बंध वाढवण्यासाठी आढावा घेत आहेत.त्याचवेळी,केंद्रीय गृह सचिवांनी सल्ला दिला आहे की ज्या भागात जास्त कोविड -19 प्रकरणे आहेत,तेथे रात्री कर्फ्यू लावण्यात यावा.गृहमंत्रालयाने दोन्ही राज्यांसोबत बैठक घेतल्यानंतर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की,'संसर्गातील वाढ थांबवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.ज्या भागात जास्त प्रकरणे येत आहेत,तेथे रात्रीच्या कर्फ्यूचा विचार केला पाहिजे.या व्यतिरिक्त,कॉन्टॅक्ट ट्रेसिंग,लसीकरण मोहीम तीव्र करणे यासारख्या उपायांनाही वाढवावे लागेल.

गृहमंत्रालयाने या राज्यांना अतिरिक्त लस देण्याचे आश्वासन दिले आहे,जेणेकरून संसर्ग नियंत्रित केला जाईल.देशात आतापर्यंत कोविड लसीचे 61 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. देशातील अर्ध्याहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा किमान 1 डोस देण्यात आला आहे.ऑगस्टच्या मध्यापासून कोरोना प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे.