बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (23:42 IST)

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ डाक पाकिटाचे आज अनावरण

Gopinath Munde
आज 3जून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन असून त्यांच्या स्मरणार्थ डाक पाकिट Postal Envelope अनावरण आज (3 जून) रोजी दुपारी एक वाजता करण्यात येणार आहे.  भाजपचे BJP राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा J P Nadda यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल पद्धतीने नवी दिल्ली आणि गोपीनाथ गड परळी येथून विमोचन सोहळा होईल.
 
लोकनेते मुंडे यांनी चार दशके समाजकारण करत व राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी शेवटपर्यंत त्यांनी संघर्ष केला. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून व त्यांच्या स्मरणार्थ डाक पाकिट व तिकीट कॅन्सलेशन शिक्क्याचे अनावरण करण्यात येणार आहे.