24 वर्षीय तरुणी स्वत:शीच लग्न करणार; लग्नानंतर हनिमूनसाठी गोव्याला जाणार
वडोदरा- लग्न ही आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय गोष्ट असून यासाठी प्रत्येक मुलगी काही वेगळी स्वप्ने पाहते. हा विचार प्रत्येकाच्या मनात घोळत राहतो की तिचा आयुष्यात येणारा राजकुमार कसा असेल. पण गुजरातमधील वडोदरा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एका मुलीचे लग्न होत आहे, पण तिला नवरदेव ती भांगेत कुंकूही भरेल, लाल रंगाचे कपडेही परिधान करेल पण नवरामुलगा नसेल. यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया...
नववधू होणारी ही मुलगी 24 वर्षांची क्षमा बिंदू आहे, तिचे या महिन्यात 11 जून रोजी लग्न होणार आहे. पण क्षमा दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नसून स्वत:शी लग्न करणार आहे. या लग्नात पाहुणे देखील असतील, त्यांची संख्या खूपच मर्यादित असेल. पण नवरदेव नसेल. इतकंच नाही तर ती हनिमूनला एकटीच जाणार आहे.
क्षमाने नववधू बनण्यासाठी लेहेंग्यापासून ते पार्लर आणि ज्वेलरीपर्यंत सर्व काही बुक केले आहे. ती तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. या लग्नात ती प्रथेनुसार सात फेरे घेणार असून सिंदूरही लावणार आहे. तिचे मित्र तिला साथ देत आहेत. गुजरातमध्ये अशा प्रकारे सोलो मॅरेजची ही पहिलीच घटना असावी.
मीडियाशी बोलताना क्षमाने सांगितले की, लहानपणापासून तिला लग्न करायचे नव्हते, पण वधू बनण्याची इच्छा होती. त्यामुळे तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून तिने असा निर्णय घेतला. क्षमा म्हणाली या प्रकारच्या विवाहाला सेल्फ मॅरिज किंवा सोलोगॅमी म्हणतात. कोणत्याही देशातील स्त्रीने स्वतःशी लग्न केले आहे का, या प्रकाराबद्दल मी ऑनलाइन शोध घेतला. मात्र कोणीही सापडले नाही.
क्षमा म्हणाली की ती एकट्याने लग्न करणारी देशातील पहिली मुलगी म्हणून एक आदर्श ठेवेल. तिने सांगितले की, काही लोक माझ्या निर्णयावर नाराज आहेत, ते कदाचित हे लग्न चुकीचे मानतील, परंतु माझे पालक खुले विचाराचे आहेत आणि त्यांनी तिच्या लग्नाला आशीर्वाद दिला आहे.
क्षमा एका खाजगी कंपनीत काम करते, ती म्हणते की लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे म्हणूनच मी लग्न करत आहे. स्व-प्रेमाचे उदाहरण देणारी मी माझ्या देशातील पहिली मुलगी आहे.
क्षमा गोत्री मंदिरात हा अनोखा विवाह करणार आहे. यानंतर तिने एकटीने हनिमूनला जाण्याचा निर्णयही घेतला आहे. हनिमूनसाठी तिने गोव्याची निवड केली आहे, जिथे ती दोन आठवडे सिंगल एन्जॉय करणार आहे.