बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जानेवारी 2025 (17:49 IST)

महाकुंभात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Shradhanjali RIP
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावाचे आयोजन करण्यात आले असून या महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केल्यावर भाविकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे वृत्त समोर येत आहे. राष्ट्रवादी शरदपवार गटाचे नेते महेश कोठे यांचा प्रयागराज येथे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना सोलापूर उत्तर मतदार संघातून राष्ट्रवादीने तिकीट दिले होते. 

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे हे प्रयागराजला महाकुंभ मेळा साठी गेले होते . तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते 55 वर्षाचे होते. 
महेश कोठे हे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढले होते. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. हे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते होते. त्यांच्या निधनाने सोलापुरात शोककळा पसरली आहे. 
Edited By - Priya Dixit