1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (23:09 IST)

परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप, अडचणीत आणखी भर पडली

Serious allegations against Parambir Singh added to the difficulty
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी भर पडलीय. निवृत्त एसीपी समशेर पठाण यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 26/11 मधील दहशतवाद्यांविरोधातला महत्त्वाचा पुरावा असलेला मोबाईलच परमबीर सिंग यांनी नष्ट केल्याचं आपल्या पत्रात समशेर पठाण यांनी म्हंटलं आहे.  26/11च्या हल्ल्यावेळी परमबीर सिंग हे एटीएसमध्ये कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाइल स्वत:कडे ठेवून घेतला होता. आजतागायत तो कसाबचा मोबाईल तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. 
 
पुढे या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतरही त्यांनी तो मोबाईल क्राइम ब्रँचकडे सोपवला नाही. त्यामुळे दहशतवादी कसाबविरोधातले पुरावे नष्ट केल्याप्रकरणी परमबीर सिंग यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.