1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (22:10 IST)

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री यांची ऑनलाईन उपस्थिती

Online presence of the Chief Minister in the Cabinet meeting
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित होते. मानेच्या आणि पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री रुग्णालयातच पोस्ट सर्जरी उपचार घेत आहेत. आठवड्याभरापासून मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरु आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थिती लावल्यावर आपली तब्येत ठीक असल्याची माहिती दिली आहे. राज्यातील १ ली ते ४थीच्या शाळा सुरु करण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वाढत्या कोरोना संदर्भात आणि पीक पाणी परिस्थिती, लसीकरण अशा विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.
 
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.