शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 ऑगस्ट 2022 (12:27 IST)

Shahaji Patil : शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी अधिकाऱ्यांची फोनवरून शाळा घेतली

शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांची एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे. या क्लिपमध्ये उजनीच्या कालव्यातून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नामुळे अधिकाऱ्यांची फोनवरूनच शाळा घेतली आहे. उजनी धरणातून हजारो क्युसेक पाणी पूराची भीती टाळण्यासाठी नदीत जात असताना खोडसाळपणा करत उजनीच्या लहान लहान उपकालव्यांना मागणी करूनही पाणी सोडले जात नव्हते हेच वास्तव शेतकऱ्यांनी आज शहाजीबापू यांना दाखवले. अधिवेशन संपल्यावर शहाजीबापू सध्या आपल्या मतदारसंघात गावोगावी फिरत असून शेतकऱ्यांची प्रश्ने सोडवत आहे. पंढरपुरात उपरी आल्यावर शेतकऱ्यांनी त्यांना खराब रस्ते, वीज, आणि पाण्याच्या संदर्भात अडचणी सांगितल्यावर सहजी बापूंनी अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी सांगून त्यांच्या कामाबद्दल त्यांची चक्क शाळाच घेतली. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून पाणी का येत नसल्याचा सवाल करीत तुमच्या हाताखालचे अधिकारी खोड्या करत असल्याचे सुनावले. एका बाजूला पाणी नदीत सोडले जात असताना उजनीच्या लहान लहान कालव्याला पाणी दिले तर उभी पिके जगतील.शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज केला असून अद्याप पाणी सोडण्यात का आले नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. परिणामी बापू शहाजी पाटील हे गावातून बाहेर पडण्यापूर्वीच उपरी येथील उजनीच्या उपकालाव्यात पाणी वाहू लागले.