बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 ऑगस्ट 2022 (10:42 IST)

'आधी झोपा काढल्या अन आता... चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

chandrashekhar bawankule
"मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे काम करण्याची चांगली संधी होती. त्या दरम्यान मात्र, त्यांनी 18-18 तास झोपा काढल्या आणि आता हातातून सर्वकाही निघून गेल्यावर राज्यभर दौरे करायचे काय कामाचे," अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. त्याअनुषंगाने आज आदित्य ठाकरे हे नागपुरात दाखल झाले. पक्ष संघटनेच्या कामाबरोबरच ते येथील तान्हा पोळा कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावरूनही आदित्य ठाकरेंवर टीका झाली.