शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (21:15 IST)

ह्याचं दार त्याचं दार बाई माझ्या तोंडात मार

sushma andhare
पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करत शिंदे गटासमोर नवे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झटत असून, खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सणसणती प्रत्युत्तर दिले आहे.
 
उद्धव ठाकरेंनी कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. त्यांच्यामध्ये दम नाही. तसे असते तर ते घरी बसले नसते, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली होती. या टीकेवर सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, 'ह्याचं दार त्याचं दार बाई माझ्या तोंडात मार' आपला मतदारसंघ सोडून दारोदार हनुमान चालिसा म्हणत फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी राहून संपूर्ण राज्याला कोरोनासारख्या महामारीतून वाचवणे हे जास्त पुण्याचे काम आहे आणि ते उद्धव साहेबांनी चोखपणे पार पाडलेय, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले.