बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना सध्या युती करायला कुणी मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडला सोबत घेतलं आहे. संभाजी ब्रिगेडने 2019ला 40 जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना 0.06 टक्के मतं मिळाली होती. उद्धवजींनी केवळ 0.06 टक्के मते घेणाऱ्या पक्षासोबत युती करावी लागत आहे. ज्यांचे अस्तित्व नाही, असेच पार्टनर त्यांना मिळतील. संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरेंनी फुसकाबार सोडला आहे, अशी टीका करतानाच उद्धव ठाकरेंना शेवटची घरघर लागली आहे. त्यांचा वाईट काळ जवळ आला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
अडीच वर्षात जनतेची दुर्गती कशी झाली हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठलाही पक्ष त्यांच्यासोबत युती करायला तयार नाहीये. त्यांचे तीन पार्टनर पळून जात आहेत. उद्धव ठाकरे यांना शेवटची घर घर लागली आहे. सध्या उद्धवजींसाठी वाईट काळ आलाय, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले