1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 11 जुलै 2022 (15:03 IST)

कोर्टाच्या आदेशानंतर थोरात,बावनकुळे,शिरसाट या नेत्यांच्या प्रतिक्रिया

balasaheb thorat
शिंदे गटाच्या बंडाळीनंतर १६ आमदारांना अपात्र करा अशा याचिका शिवसेने दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. विधानसभा अध्यक्षांनी तूर्त कोणताही निर्णय घेऊ नये असा आदेश महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी आनंद तर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात,भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया..
 
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या कामकाजाच्या नियमावलीमध्ये अनेक फेरबदल होतील. अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. कोर्टाने मंत्रिमंडळ स्थापन करु नका असे कोणतेही बंधन घातले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, पक्षांतर बंदीला अभिप्रेत आहे असा निर्णय व्हावा. कोर्टाने दिलेल्या आजचा निर्णय अभ्यासावा लागेल त्याशिवाय यावर बोलणं उचित होणार नाही. राष्ट्रपती पदाच्या निवडणूकी संदर्भात शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला आहे का याची कल्पना नसल्य़ाचेही त्यांनी सांगितले.