शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (21:13 IST)

'त्या' वादावर समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार

शिर्डीतील साई मंदिरात फुल, हारं आणि प्रसाद नेण्यावर बंदी आणल्याने  मोठा वाद रंगतोय. या वादावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक बैठक घेतली, या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची घोषणा केली आहे. तसेच समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. साई संस्थान, स्थानित विक्रेते आणि ग्रामस्थांची एक बैठक पार पडली. या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
 
या बैठकीनंतर बोलताना विखे पाटील म्हणाले की, या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये सीईओ, कार्यकारी अधिकारी, डीडीआर यांचा समावेश आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे. एक महिन्यात या समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश आहे, ज्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे किमान एक महिन्यानंतर मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद वाहता येणार नाही.