गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2017 (14:37 IST)

राष्ट्रपती मुखर्जींकडून भूषणावह कामगिरी - शरद पवार

भारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकशाहीला भूषणावह कामगिरी करून मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी  यांनी राष्ट्रपतीपदाला पूर्ण न्याय दिला आहे, असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार  यांनी काढले.

राष्ट्रवादीचे सर्व खासदार व वरिष्ठ नेत्यांनी नवी दिल्ली येथे मावळते राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेतली. या वेळी मुखर्जी यांनीही पवार यांच्या प्रदीर्घ संसदीय कारकीर्दीचे कौतुक केले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार नेते प्रफुल्ल पटेल , तारिक अन्वर, सुप्रिया सुळे , विजयसिंह मोहिते-पाटील, उदयनराजे भोसले, वंदना चव्हाण, माजिद मेमन, फैजल उपस्थित होते.