लाडकी बहीण योजनेचा प्रभाव तर आहे, निकालानंतर शरद पवार यांनी स्वीकारले
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती जिंकली असून आता एक दिवसांनंतर एनसीपीचे नेता शरद पवार यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली.
ते कराड दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त केले.ते म्हणाले, हा निकाल लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आहे. हे महायुतीच्या जिंकण्याचे कारण आहे. हा निर्णय जनतेचा आहे. मी सध्या या वर काहीच भाष्य करणार नाही.
ते म्हणाले, मी अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. असा निकाल प्रथमच आला आहे. आता पराभवाच्या कारणांची अभ्यास करून करणे शोधावी लागणार आहे. आता पुढे जोमानं उभे राहू आणि पुढे काय करायचे ते मी आणि सहकारी ठरवू.
लाडकी बहीण योजनेचा प्रभाव निकालात दिसून आला आहे. महिलांनी मत दिले नाही तर हे पैसे देणे बंद केले जाईल असे ऐकण्यात आले होते. त्यामुळे बहिणींनी भीतीपोटी मत दिले असे दिसून येत आहे.
Edited By - Priya Dixit