बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (18:53 IST)

शरद पवारांचे संपकऱ्यांना आवाहन

sharad pawar
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करत संप मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नाशिकमधील एसटी कर्मचारी अद्यापही आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
 
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्य परिवहनमंत्री अनिल परब यांची २२ कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसोबत सह्याद्री अतिथीगृहावर आज, सोमवारी बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शरद पवार आणि अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. ‘सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होती’,असे आवाहन शरद पवार यांनी केले. ‘कामावर या, कामावर येऊन न्याय हक्क मागण्याचा आपल्याला अधिकार आहे’, असे अनिल परब म्हणाले.
 
दरम्यान  मुंबई येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह २२ संघटना सहभागी होत्या. बैठकीनंतर संप मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही आनंदाची बातमी असतांना दुसरीकडे नाशिकमध्ये एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे दिसून आले.
 
नाशिक येथील कर्मचार्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की आज बैठकीत समील झालेल्या २२ संघटनांशी आमचा संबंध नाही, आमचा दुखवटा आंदोलन सुरूच राहणार असून विलनीकरण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे सांगितले.
 
त्यामुळे पुन्हा एकदा एका यशस्वी बैठकीनंतरही नाशिक मधील कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा विलीनीकरणा चा तिढा आणखी वाढला आहे.