सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (18:49 IST)

गोवा राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यास काँग्रेस पक्ष अनुत्सुक

sanjay raut
गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग कायम रहावा यासाठी राज्यातील आघाडी सरकार गोव्यात एकत्रित विधानसभा निवडणूका लढविण्याबाबत उत्सुक होते. मात्र आता गोव्यात स्वबळावर सत्ता आणता येईल असे काँग्रेसला वाटत असल्याने कदाचित ते महाविकास आघाडीच्या प्रयोगाला तयार नसावेत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी स्पष्ट केले.गोवा राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यास काँग्रेस पक्ष उत्सुक नसल्याची माहिती समोर आली असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी त्याला दुजोरा दिला.
 
पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार गोव्यातही एकत्रित निवडूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यातील विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असले तरी काँग्रेस मात्र त्यांच्यासोबत नसल्याचे स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली.