शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (09:00 IST)

भाजपचं काम म्हणजे लबाडाच्या घरचं आवताण जरी असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं अशी टीका शरद पवारांनी केली

sharad pawar
"गेल्या दहा वर्षात भू-विकास बँकेचे कर्ज एकाला तरी मिळालं का? भूविकास बँक अस्तित्वात आहे का? भूविकास बँक होती का? याची माहिती नाही. 25 ते 30 वर्षे झाली बँकेची कोणी कर्ज वसुली केली नाही. राहिलेली वसुली होणार नाही हे कळल्यावर, कर्ज माफी देण्यात आली. लबाडाच्या घरचं आवताण जरी असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं असं भाजपावल्याचं काम आहे," अशी टीका शरद पवारांनी केली आहे.'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
 
शरद पवारांनी पुरंदर येथे शेतकऱ्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 964 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
 
राज्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यावर बोलताना "अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्या नुकसानीची भरपाई केंद्र आणि राज्य सरकारने करावी म्हणून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. यासाठी संघर्ष करावा लागला तर चालेल," असेही शरद पवारांनी सांगितलं.
Published By- Priya Dixit