शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (14:32 IST)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राव साहेब दानवे एकाच गाडीतून, चर्चेला उधाण

सध्या राज्यात मोठे राजकीय घटनाक्रम घडत असताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राव साहेब दानवे यांचा एकाच गाडीतून प्रवास केल्याचा व्हिडीओ समोर आल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. बीडच्या गेवराई शहरात माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या समारंभाला केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे, सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, आमदार राजेश टोपे, धनंजय मुंडे, सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.  यावेळी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राव साहेब दानवे एकाच गाडीतून एकत्र औरंगाबादहून निघाले.दोघेही एकत्र एकाच गाडीतून असल्याचा व्हिडीओ समोर आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.  
 
Edited By - Priya Dixit