गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (13:33 IST)

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचे पर्याय दिले

uddhav
शिवसेनेच्या कोणत्याही गटाला पुढील सूचना मिळे पर्यंत 'धनुष्य बाण' चिन्ह वापरता येऊ शकणार नाही असे  निवडणूक आयोगाने जाहीर केल्यावर आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यावर आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटासाठी संभावित नाव आणि चिन्ह ठरवलं आहे. त्यांच्या कडून त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल असे हे तीन चिन्हे निवडणूक आयोगाला देण्यात आले असून तिन्ही चिन्हे हिंदू धर्माशी संबंधित आहे. तसेच त्यांनी आपल्या गटाचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन नाव सुचवले असून या तीन चिन्ह आणि नावांपैकी एक नाव देण्याची मागणी उद्धव  ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केली.
Edited By - Priya Dixit