गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (23:01 IST)

शरद पवार यांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

Sharad Pawar gave 'yes' advice to Raj Thackeray Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (सर्वेसर्वा राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद वाढताना दिसत आहेत. परस्परांवर टीकेची झोड उठवताना दिसत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून वेगवेगळे अंतर्गत वाद वाढले आहेत, सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचं भाष्य केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर विविध पक्षांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. यांनतर आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी देखील यात उडी घेतली आहे.
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या या वक्तव्यावरून विचारणा केली असता पवार म्हणाले की, ‘राज ठाकरे यांना फार सल्ला काही देऊ शकत नाही. मात्र, राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी जे लिखाण केले आहे ते वाचावे.
 
या दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर पुण्यातील मराठा आणि संभाजी ब्रिगेड संघटनांच्या वतीने राज ठाकरे यांच्याविरोधात विविध वक्तव्य आली होती.यांनतर आता राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी जे लिखाण केले आहे. ते वाचावे याबाबत सल्ला थेट शरद पवारांकडूनच राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देण्यात आला आहे.