शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (16:01 IST)

शरद पवार यांना मिळाला डिस्चार्ज

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना चार दिवसानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांचा प्रकृतीत सुधारणा होत असल्याने निर्णयी त्यांना ७ दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांना सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. तसेच पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे उपस्थित होते.
 
दरम्यान शरद पवार यांची १५ दिवसाने पुन्हा एकदा प्रकृतीची तपासणी करण्यात येईल. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचावर शस्त्रक्रिया करून पिशवीतून खडा काढण्यात आलेला. त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. पवारांना आराम वाटू लागल्याने आज अखेर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच पत्नी आणि कन्येसह ते सिल्व्हर ओकला पोहोचले आहेत.