शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (09:20 IST)

शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे २० आणि २१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदूरबार जिल्ह्य़ाचा दौरा करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी पक्ष बदलल्यानंतर भाजपमधील आपले कार्यकर्ते आणि असंतुष्ट नेते फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने शरद पवार यांचा हा दौरा महत्त्वाचा असून भविष्यात खडसे जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक परिसरात भाजपला मोठे आव्हान निर्माण करू शकतात.