1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Sharad Pawar on PM Modi on 75 th Birthday said why I should stop him

Sharad Pawar on PM Modi मी थांबलो नाही तर मोदींना का थांबवेन? पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी शरद पवारांचा बदललेला पवित्रा

Sharad Pawar on PM Modi राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पवार यांनी ट्विटरवर लिहिले की, "मी तुम्हाला शुभेच्छा देतो. देव तुम्हाला चांगले आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य देवो." ते असेही म्हणाले की, "तुमच्या नेतृत्वाखाली आपला देश प्रगती करत राहो आणि येणाऱ्या काळात आणखी मोठी प्रगती साधत राहो अशी माझी इच्छा आहे."
 
“मी थांबलो नाही, तर मोदींना थांबा म्हणू शकत नाही”
या विधानाने त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी स्वतः अजून राजकारणात सक्रिय आहेत, थांबले नाहीत. त्यामुळे दुसऱ्याला “पंचाहत्तर (७५ वर्ष) नंतर राजकारणातून दूर व्हा” असे म्हणण्याचा त्यांना नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.  त्यांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि असे म्हटले की राजकारणात अशा प्रसंगी कटुता नको.
 
शरद पवारांचे हे विधान वय किंवा वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राजकारणातून निवृत्ती याबद्दलच्या चर्चेला उत्तर आहे. त्यांच्याप्रमाणे वयामुळे राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय नैतिक दबावातून असू नये, तसेच स्वतःचा निर्णय असावा, जो व्यक्तीच्या इच्छेवर आणि क्षमतेवर आधारित असतो.
 
त्यांचे म्हणणे हे आहे की जगण्याची, काम करण्याची ऊर्जा आणि इच्छाशक्ती असताना, वय किंवा वाढदिवस यांना कारण बनवून "थांबावे" असे सांगणे योग्य नाही.
 
या दरम्यान त्यांनी भाजपा नेत्यांच्या (विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या) कामकाजातील काही विषयांवर टीका केली, विशेषत: शेतकऱ्यांच्या अडचणी, अतीवृष्टीत नुकसान, आणि सरकारमधील बातमीपत्र दिशेने जाहिरातबाजी यावर लक्ष दिले पाहिजे असे म्हणत त्यांनी मागणी केली.
पुढील लेख
LIVE: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून वाद सुरू झाला