शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (15:13 IST)

शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे, ते आपल्याला माहिती आहे

sharad pawar
शरद पवार यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीबाबत बोलताना भाजपा मित्रपक्षांना संपवते, अशी टीका केली होती. पवारांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “कमी आमदार असतानाही आम्ही शिवसेनाला मुख्यमंत्रीपद दिलं असून मुळात शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे, ते आपल्याला माहिती आहे”,असे दे म्हणाले.
 
“शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्याकडे ५० आमदार आहेत. तर आमच्याकडे ११५ आमदार आहेत. तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रीपदही दिले आहे. काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असे १८ जणांनी शपथ मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मला असं वाटतं की शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे, ते आपल्याला माहिती आहे”,अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.