सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र या प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. याच कारणामुळे ईडीच्या कारवाईमुळे शरद पवार गप्प का? यावर पवार यांची मुलगी तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबबत प्रतिक्रिया दिली आहे.
“देशात आणि राज्यात काहीही झालं तरी शरद पवार यांच्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होत नाही. नवाब मलिक, अनिल देशमुख असो किंवा आता संजय राऊत, आम्हाला या गोष्टी अपेक्षित होत्या. आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत. आरोप झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून सर्व तपास संस्थांना सहकार्य करायचे, असे आम्ही ठरवले होते. आम्ही आमचे कुटुंब आणि देशाला उत्तरदायी आहोत,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहे.