सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (16:09 IST)

संजय राऊत यांना आज अटक होण्याची शक्यता- उद्धव ठाकरे

uddhav sanjay
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) पथकानं छापा मारला आहे. मुंबईतील भांडुपमधील घरावर ईडीनं छापा मारला आहे.
 
आज (31 जुलै) सकाळपासून राऊत दाम्पत्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की "संजय राऊत यांची केवळ चौकशी होत आहे. कर नाही त्याला डर कशाला, रोज तेच सांगत होते की त्यांनी काही केलं नाही. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते होते," असं शिंदे यांनी म्हटले.
 
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी असलेल्या छाप्यांवरून टीका करताना म्हटलं की, ही दमनशाही, दडपशाही सुरू आहे.
 
"संजय राऊत यांना आज अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी 'रोखठोक' लिहिलं, त्यात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे कारस्थान निर्लज्जपणे सुरू आहे," असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
 
राजन विचारे यांच्या नेतृत्वात ठाणे येथून शेकडो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला 'मातोश्री'वर आले होते. त्यांच्याशी बोलताना उद्धव यांनी संजय राऊत यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली.