संबंधित माहिती
- शिंदे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का?
- शिवसेनेवर एकनाथ शिंदेंचा दावा, पक्षाचा आदेश झुगारून नेमला नवा प्रतोद
- आरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडवरून पुन्हा वाद का पेटला आहे?
- शाळकरी मुलांची रिक्षा पलटी, विद्यार्थी थोडक्यात बचावले
- राज्यात पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ टीम तैनात
मुंबईच्या आमदारांच्या प्रगती पुस्तकात पहिल्या तीन आमदारांत शिवसेना आमदार
मुंबईच्या आमदारांच्या प्रगती पुस्तकात पहिल्या तीन आमदारांत शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी नंबर पटकावला आहे. प्रथम क्रमांकावर काँग्रेसचे आमदार अमिन पटेल तर त्यापाठोपाठ तिसऱया स्थानावर सुनील प्रभू यांनी 77.19 टक्के गुण पटकावले आहेत.
लोकप्रतिनिधी या नात्याने मुंबईतील आमदारांनी त्यांच्या वैधानिक आणि संविधानिक जबाबदाऱयांची पूर्तता कशाप्रकारे केली आहे? त्याचे मूल्यांकन या प्रगती पुस्तकात केले आहे. भाजपचे पराग अळवणी दुसऱया स्थानावर असून मुंबईतील आमदारांच्या कामगिरीनुसार आमदाराची श्रेणी ठरवण्यात आली आहे. या क्रमवारीत विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजप नेते मंगलप्रभात लोढा हे शेवटच्या स्थानांवर आहेत.
यात पाच मंत्र्यांना वगळण्यात आलेलं आहे. मुंबईतील 31 विधानसभा मतदारसंघातील आमदारांचा अहवाल या प्रगती पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
