सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (13:51 IST)

शाळकरी मुलांची रिक्षा पलटी, विद्यार्थी थोडक्यात बचावले

महाराष्ट्रातील पालघर येथे एक रिक्षा पलटून अपघात झाला. या रिक्षात शाळकरी मुलं होते. सुदैवाने ते थोडक्यात बचावले.ही  घटना पालघर सातपाटी मार्गावर चुना भट्टी येथील सोहेल इम्पेक्स कंपनी समोर घडली.या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज अंगाला थरकांप उडवणारा आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक काळी पिवळी टॅक्सी चाणक्य इंग्लिश हायस्कुलचे विद्यार्थ्यांनी भरलेली भरधाव वेगानं येताना दिसत आहे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून ही टॅक्सी खांब्याला धडकते आणि कोलांट्याखाऊन पलटी होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या अपघातात सर्व विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व विद्यार्थी थोडक्यात बचावले. 
या अपघाताच्या आवाजाने आजूबाजूची लोकं लगेचच अपघातग्रस्त वाहनाच्या दिशेनं धावली. त्यांनी तातडीनं विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.