मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2022 (14:55 IST)

गृहमंत्री पद देणार असतील, तर सत्तेत सहभागी होऊ-अमित ठाकरे

amit thackeray
“गृहमंत्री पद दिले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करु”, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केले आहे. अंबरनाथमध्ये मनसेतर्फे संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्त्व्य केले.

शुक्रवारी संवाद दौऱ्यानिमित्त अमित ठाकरे यांनी मुंबई ते अंबरनाथ लोकल प्रवास केला. त्यानंतर अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंत्रिमंडळ विस्तारात मनसेला दोन पदे मिळणार असल्याची चर्चा सुरु असल्याबाबत पत्रकरांनी अमित ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना अमित ठाकरेंनी सूचक विधान केले.