चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘दाढी’ असा उल्लेख करत टीका केली
शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाढी असा उल्लेख करत टीका केली आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रे दरम्यान युवासेनेच्या सभेमध्ये भाषणादरम्यान खैरे यांनी महाविकास आघाडी सरकार पडत नसल्याने भाजपाने दाढीला सोबत घेऊन सरकार पाडल्याची टीका केलीय.
चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच येथे जमलेले सर्वजण हे ठाकरेंच्या पाठीशी आहेत, असं सांगितलं. “इथे जे जमले आहेत ते ठाकरे परिवाराची आहे. ही जनता फक्त ठाकरे कुटुंबाला मानते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आपण (आदित्य ठाकरे),” असं खैरे मंचावर बसलेल्या आदित्य ठाकरेंकडे पाहत म्हणाले. पुढे बोलताना, “आपण आता ज्या मार्गाने आलात त्यावर किती लोक थांबले होते हे आपण पाहिलं असेल. ठाकरे बाहेर पडले की लगेच वलय निर्माण होतं,” असं ते म्हणाले.