सर्कसमध्ये काहीही होऊ शकतं- आदित्य ठाकरे
"सध्या लोकशाहीची थट्टा सुरू आहे. आमच्याकडून राजकारण कमी झालं. सर्कसमध्ये काहीही होऊ शकतं", अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करुन नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून घोषित करण्यात आले आहे.
तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"सर्कसमध्ये काहीही होऊ शकते. राज्यात जे सुरू आहे ते घटनाबाह्य आहे. ही लोकशाहीची थट्टा सुरू आहे. मी याकडे जास्त लक्ष देत नाहीये. आमच्याकडून राजकारण कमी झालं, हा आमचा दोष असू शकतो. चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसते. त्यामुळे हादेखील आमचा दोष असू शकतो. आम्ही लोकांची 24 तास सेवा करत आहोत. आमचं हे काम अजूही सुरू आहे," असं आदित्य म्हणाले.