1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2022 (14:43 IST)

मनावर दगड ठेवून सर्वांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं - चंद्रकांत पाटील

chandrakant patil
मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पनवेल येथील भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले.पनवेल येथील भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
 
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, "असा एक नेता देण्याची गरज होती की ज्याच्यातून योग्य तो मेसेज जाईल. आपण जे काही करतोय त्याच्यामधून स्थिरता येईल.
 
"त्यामुळे अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी, केंद्रीय नेतृत्वानं आणि देवेंद्र फडणवीसांनी निर्णय केला की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील. दु:ख झालं आपल्याला. पण ते दु:ख पचवून आपण आनंदाने हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेलो." या वेळी चंद्रकांत पाटील यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले. मुंबईत देखील भगवा फडकवायचा असून मुंबईत जिंकून यायचेआगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ. नेत्यांनी आदेश करायचा नसतो, इच्छा व्यक्त करायची असते, आणि आपण त्याचं पालन करायचं असतं,  आहे. या नाही आता तयारीला लागायचे असल्याचे त्यांनी म्हटले. शपथविधी झाल्यापासून सर्वजण मुंबईत आहे. आता आपल्या घरी जावे आणि कामाला लागावे. सर्व ठरल्यावर पुन्हा आपल्याला बोलावण्यात येईल. आगामी काळात नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका आहेत. या निवडणुकात कोणाला तिकीट मिळालं नाही तर त्यांनी रुसू नये. असे म्हटले आहे.