बुधवार, 8 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2022 (20:54 IST)

पश्चिम रेल्वे गारेगार, आणखी एक एसी लोकल धावणार

Western Railway
मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर महिनाभरात आणखी एक एसी लोकल धावणार आहे. चेन्नईच्या रेल्वेच्या इंटीग्रल कोच कारखान्यात या एसी लोकलची बांधणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल दाखल झाली. मध्य रेल्वेची ही सहावी एसी लोकल आहे.
 
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या सात एसी लोकल गाड्या आहेत. या सातपैकी चार एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत असून दोन गाड्या देखभाल दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये आहेत. यामध्ये आता आणखी एका एसी लोकलची तांत्रिक चाचणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. एसी लोकलची ही तांत्रिक चाचणी यशस्वी ठरल्यास या महिनाअखेरीस आठवी एसी लोकल मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.