बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2022 (20:36 IST)

Monkeypox: जगातील 60 देशांमध्ये पसरला मंकीपॉक्सचा धोका, WHO ने आता केली मोठी घोषणा

Monkeypox Global Public Health Emergency: मंकीपॉक्स विषाणू जगातील 60 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराबाबत मोठी घोषणा केली आहे. मंकीपॉक्सचा धोका जागतिक स्तरावर दिसून येत असल्याचे WHO ने म्हटले आहे. या प्राणघातक विषाणूचा धोका युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक आहे. सध्याची परिस्थिती पाहता, त्याचा आणखी आंतरराष्ट्रीय प्रसार होण्याचा स्पष्ट धोका आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तथापि, आंतरराष्ट्रीय वाहतुकीत व्यत्यय येण्याचा धोका सध्या कमी आहे. सर्व धोके लक्षात घेऊन, WHO ने मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे.
 
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी शनिवारी सांगितले की, वेगाने पसरणारा मांकीपॉक्सचा उद्रेक जागतिक आरोग्य आणीबाणीचे प्रतिबिंबित करतो. जागतिक आरोग्य आणीबाणी ही जागतिक आरोग्य संघटनेची सर्वोच्च पातळीचा इशारा आहे. ट्रेडोस म्हणाले की, आता मंकीपॉक्सला आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याची गरज आहे. यासोबतच, लस आणि उपचार सामायिक करण्यासाठी निधी आणि जागतिक प्रयत्नांची गरज आहे.
 
जिनिव्हा येथे मीडिया ब्रीफिंग दरम्यान आरोग्य आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय जाहीर करताना, टेड्रोस यांनी पुष्टी केली की समिती एकमत होण्यात अयशस्वी ठरली आहे. या वर्षी आतापर्यंत 60 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सची 16,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि आफ्रिकेत या आजारामुळे 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.