गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 11 जुलै 2022 (14:59 IST)

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

rape
शहरात तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संशयित आरोपीने तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून संशायीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिडीतेचे आई- वडील वेळोवेळी तिचे लग्न जमवण्याचा प्रयत्न करायचे. मात्र घटनेतील संशयित आरोपी तिचे लग्न मोडीत काढायचा. त्यासोबतच संशयित पिडीतेसोबत राहण्याची, तिच्यासोबत लग्न करून तिला दुसरी बायको म्हणून ठेवण्याची देखील मागणी करायचा. संशयित पिडीत तरुणी जर आपल्यासोबत राहिली नाही, तिने शारीरिक संबंध ठेवले नाही तर तिचे अश्लील फोटो व्हायरल करेल अशी धमकी देत असल्याची माहिती पिडीतेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी अद्याप ताब्यात आला नसून घटनेचा तपास आडगाव पोलिसांकडून सुरु आहे.