1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (08:18 IST)

सलमान खानला धमकीचे पत्र पाठविणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

Man arrested
मुंबई :बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलामान खानला धमकीचे पत्र पाठविणार्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याची कसून चौकशी सुरू आहे. सलमानचे वडील सलीम खान यांना घराजवळच्या बाकडय़ावर सापडलेलं पत्र तिथं ठेवणाऱ्या लोकांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
 
पंजाबमधील गायक, काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर फरार झालेला गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. याच चौकशीदरम्यान हा खुलासा झाल्याची माहिती समोर आली आहे. महाकाल हा बिष्णोई टोळीचा सदस्य आहे. महाकाळने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बिष्णोईचा सहकारी विक्रम बराडने तीन लोकांच्या माध्यमातून हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवलं. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू‘ असे या पत्रात लिहण्यात आले होते.
 
तुरुंगामध्ये असणार्या लॉरेन्स बिष्णोईने हे पत्र सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावे पाठवलं होतं. राजस्थानमधील जलोरी येथून बिष्णोई टोळीचे तीन जण मुंबईमध्ये आले होते. त्यांनीच हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवलं. तसेच त्यांनी सौरभ महाकालचीही यावेळी भेट घेतली,” असं पोलिसांनी चौकशीदरम्यान समोर आल्याचं स्पष्ट केलंय. तसेच हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम करणार्या तीन जण कोण आहेत याबद्दलची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली असून, याचा अधिक तपास सुरू आहे