गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (15:22 IST)

शरद पवार तब्बल 24 वर्षानंतर पुण्यातील कॉँग्रेसभवन मध्ये येणार

sharad pawar
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तब्बल 24 वर्षानंतर पुण्यातील कॉँग्रेसभवन मध्ये येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच कॉंग्रेस भवनच्या प्रांगणात पाऊल ठेवणार आहे. शरद पवार यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी कधीही पुण्यातील कॉंग्रेस भवनात पाय ठेवला नव्हता, काँग्रेस भवनातील कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थिती लावली नव्हती. इतकंच कॉंग्रेस बरोबर युती असतांना शरद पवार कधीही कॉंग्रेस भवन येथे आले नाही. 
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्या अशी विनंती कॉंग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पवार यांनी केली होती. शरद पवार यांनी कुठलीही अडचण न सांगता कार्यक्रमाला येण्याचा शब्द दिला आहे त्यानुसार शरद पवार हे सायंकाळी कॉंग्रेस भवनात दाखल होणार आहे.

Edited by - Ratnadeep Ranshoor