गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2023 (20:44 IST)

शरद पवारांच्या निर्णयाने जयंत पाटील यांना आश्रू अनावर; निर्णय मागे घेण्याची केली विनंती

Jayant Patil
पुण्यात लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या अनावरणाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्य़ा अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने सभागृहात एकच खळबळ माजून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. अत्यंत भावूक वातावरणात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपले आश्रू अनावर झाले. आपल्या निवेदनात त्यांनी शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली.
 
कार्यकर्त्यांच्य़ावतीने निर्णय मागे घेण्याची विनंती करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार यांनी बोलण्यास सुरवात केली. सुरवातीलाच ते भावुक झाले आणि आपल्या आश्रूंना वाट करून दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले “आम्ही आयुष्यभर शरद पवारसाहेबांच्या नावाने मत मागत आलो आहे. शरद पवारांनी अध्यक्ष म्हणून राहणे हे केवळ पक्षाच्याच नाही तर देशातील राजकारणामध्ये महत्वाचे आहे. असा अचानक निर्णय घेण्य़ाचा पवार साहेबांना कोणताही अधिकार नाही. मी आपल्य़ा सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो कि त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा.”अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 
 
Edited By - Ratnadeep Ranshoor