पवार यांची चंद्राबाबू, फारूक अब्दुल्ला यांच्या सोबत भेट
२०१९ आणि इतर निवडणुका जवळ असून त्यासाठी सर्वच पक्ष चाचपणी करत आहेत, चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका सोबतच येत्या काळातील लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग दिसून येतो आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, आंध्रप्रदेशचे एन चंद्राबाबू नायडू आणि नॅशनल कॉन्फरेन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची दिल्लीत झालेली भेट झाली असून तिला महत्व प्राप्त झाले आहे. तिघांच्या भेटीचे वृत्त देशभरात वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर तिघांनी पत्रकार परिषद बोलवून भेटीतील चर्चेची माहिती दिली. मात्र दिल्लीत काही तरी मोठं राजकारण शिजतंय अशी चर्चा सुरू होती.
शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की आज देश मोठ्या विचित्र अशा राजकीय परिस्थितीतून जात आहे. अशा वेळी गैरभाजप पक्षांनी एकत्र उभे राहून त्याविरोधात लढा दिला पाहिजे या विचारांनी आम्ही तीन पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली. देश-लोकशाही-संविधान वाचवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, त्यामुळे पवार एक आघाडी तयार करू पाहत असून त्याचा ते फायदा घेवू पाहत आहेत.