मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016 (17:29 IST)

गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे निधन

shashikala kakodkar
गोव्याच्या दुसर्‍या व एकमेव महिला माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे शुक्रवारी पणजी येथे राहत्या घरी निधन झाले. त्या 81 वर्षाच्या होत्या. काकोडकर या गोव्याचे पहिले माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कन्या होत. शशिकला काकोडकर यांनी महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या सरकारात 1973 ते 1979 या काळात गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा मान भूषवला. त्यांच्याकडे देशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असल्याचा देखील मान आहे.