शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अहमदनगर , शनिवार, 22 मे 2021 (16:25 IST)

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आले आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी कि, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी सांगितले कि, तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावातील दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका मुलासोबत शनिवारी विवाह होणार होता.
 
याची माहिती आम्हालासमजली. त्यानंतर तात्काळ आम्ही संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना याबाबत माहिती दिली.
 
त्यानंतर आम्ही तेथे जाऊन मुलीच्या वडिलांची समजूत घातली. त्यांचे समुपदेशन केले. मुलीच्या वडिलांना हे सर्व मान्य झाले.
 
त्यांनी मुलीचा विवाह ती सज्ञान झाल्यानंतर करणार असल्याचे सांगत, बालविवाह करणार नसल्याचे लेखी दिले आहे. त्यामुळे हा विवाह रोखण्यास आम्हाला यश आल्याचेही ॲड. गवांदे यांनी सांगितले.