शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (09:20 IST)

भांडण सोडवण्यासाठी गेली अन जीव गमावून बसली

murder knief
इगतपुरी शहरात आज पहाटेच्या सुमाराला विवाहित महिलेचा धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छातीमध्ये चाकू खुपसून ही हत्या झाली आहे. ह्या घटनेमुळे शहरात भीतीग्रस्त वातावरण पसरले आहे. गायकवाड नगर भागातील ही महिला असून जकीया शेख असे तिचे नाव आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.

ह्या खुनप्रकरणी ७ संशयित आरोपींचे नाव समोर आले असून ते सर्वजण फरार झाले आहेत. आरोपी आणि त्याच्या आईत झालेला वाद मिटवण्याच्या प्रयत्नात ह्या महिलेचा खून झाल्याचे समजते.नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उप अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत पथवे आणि पोलीस पथकाने तपास सुरु केला आहे. लवकरच संशयित आरोपींना गजाआड करण्यात येईल असा विश्वास व्यक्त होत आहे.