शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास?’
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालावरून सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांमध्ये टीकेच्या गजाली रंगल्या आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मालवणी भाषेत ट्वीट करून सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका केली होती. त्यांच्या या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी मालवणीतच उत्तर दिलं आहे.
आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो, भाजप आमदार आशिष शेलारांचं ट्वीट
जिल्हा बँक निवडणुकीत भाजपनं वर्चस्व राखल्यानंतर भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ट्वीट केलं आहे. सिंधुदुर्ग बँकेचा निकाल हा मुंबई, ठाणे व नवी मुंबई महापालिकेच्या निकालची नांदी आहे. हिंमत असेल तर तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला यावे, आम्ही तयार आहोत, असं शेलार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, शेलार यांनी मालवणी भाषेत आघाडी सरकारला टोला हाणला आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो… असं त्यांनी म्हटलं आहे.