सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जून 2024 (12:19 IST)

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

Shinde & Sihn
महाराष्ट्राचा मान्सून सत्र सुरु होणार आहे. या दरम्यान बातमी आली आहे की, एकनाथ शिंदे सरकार, मध्य प्रदेश मध्ये असलेली लाडली बहना योजना सारखी एखादी योजना राज्यात आणू शकतात.
 
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदातांना जागृत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवीन योजना आणण्याचा विचार करीत आहे. शिंदे सरकार विधासभेच्या मान्सून सत्र दरम्यान आपले शेवटचे बजेट सादर करणार आहे. या बजेट मध्ये मध्यप्रदेशची लाडली बहना सारखी योजना घोषित केली जाऊ शकते. या योजने अंतर्गत 21 ते  60 वर्ष असलेल्या महिलांना प्रतिमा 1.5 हजार देण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करीत आहे. 
 
2023 मध्ये सुरु केली होती लेक लाडकी योजना-
वर्ष 2023 मध्ये शिंदे सरकार ने लेक लाडकी योजना सुरु केली होती. या योजनेचा उद्देश मुलींना योग्य शिक्षण मिळणे होते. लेक लाडकी योजना अंतर्गत ज्या लोकांजवळ पिवळे आणि भगवा रंग असलेले रेशन कार्ड आहे, त्या घरातील मुलीला जन्म झाल्यानंतर 18 वर्षाची होइसपर्यंत शिक्षणासाठी एकूण 98 हजार रुपए देण्याचे घोषित केले होते. तसेच राज्य सरकारच्या परिवह बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला यात्रींना बस तिकिटांमध्ये 50 प्रतिशत सूट पहिलेच देण्यात आली होती.