शिंदे यांचा हॉटेलमधला नवा व्हिडिओ, भाजप सोबत जाणार
शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीतल्या हॉटेलमधला नवा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना मार्गदर्श करताना दिसत आहेत. आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांना देत असल्याचं समर्थक आमदार सांगतायत. त्यानंतर सर्व आमदारांनी हात वर करुन त्याला समर्थन दिलं.
जे काय सुख-दु:ख आहे ते आपल्या सर्वांचं आहे, काही असेल तर आपण एकजुटीने कितीही काही होऊ द्या विजय आपलाच आहे असं एकनाथ शिंदे सांगताना दिसत आहेत.
भाजप नॅशनल पार्टी आहे, महाशक्ती आहेत, त्यांनी अख्ख्या पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्यांनी मला सांगितलंय तुम्ही जो हा निर्णय घेतलाय तो ऐतिहासिक आहे. तुमच्या मागे आमची पूर्ण शक्ती आहे, कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही याची प्रचिती जेव्हा जेव्हा आवश्यकात भासेल तेव्हा तेव्हा सर्वांना येईल.