शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 सप्टेंबर 2023 (16:58 IST)

Shindkheda : वडिलांसह दोन मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू

drowning-in-sea
धुळेंच्या तापीनदीवर गेलेल्या वडील आणि दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी घडली आहे. हरिसिंग भीमसिंग देवरे(35), आकाश(8), नवसी(10) असे मृत्युमुखी झाल्याचे नाव आहे. 

हे सर्व सेंधवा मध्यप्रदेशाचे रहिवासी आहे. हे मजुरीसाठी नेवाडे तालुका सिंदखेडा येथे आले होते. हे गेल्या चार वर्षांपासून वास्तव्यास होते. 
 
शुक्रवारी दुपारी शेतातील झोपडीतून नदीकाठी हरसिंग देवरे त्यांचा मुलगा आणि मुलगी नवसी गेले असता पाण्यात उतरले त्यांना पाण्याचा अंदाज लागला नाही. आणि ते पाण्यात बुडाले. दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. 
 
त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी शिंदखेडा ठाण्यात त्यांची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit