शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात उत्तम कार्य करावे- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
नाशिकशिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात काम करतांना सभासद, ग्राहक,खातेदार यांचे समाधान करून शिवसेनेचा मूलमंत्र जपावा. आगामी निवडणुकीत याचा पक्षाला फायदा होईल असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकरी बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांची निवड झाल्यानंतर त्यांनी व नवनिर्वाचित शिवसैनिक संचालक यांच्या समावेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी अध्यक्ष व संचालक यांना मार्गदर्शन करतांना पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले की, ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. सहकार क्षेत्रात काम करतांना शिवसैनिकांनी हा मूलमंत्र जपावा.बँक एक वित्तीय संस्था आहे.सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक कार्य करून सभासद, खातेदार, ग्राहक यांचे समाधान करावे, याचा येणाऱ्या निवडणुकात पक्षाला नक्की फायदा होईल, असा आशावाद व्यक्त करीत भावी काळासाठी शुभेच्या व्यक्त केल्या.
या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक माजी नगरसेविका रंजना प्रकाश बोराडे, सुधाकर जाधव,श्रीराम गायकवाड,अरुण जाधव, योगेश नागरे,सह पोपट गोडसे,राहुल बोराडे,गणेश गडाख, कुलदीप आढाव, रत्नाताई चौधरी,बापू बोराडे, आदी उपस्थिती होते.