शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन : ‘अग्निवीर नावाचं टूमणं काढलंय, पण तीन-चार वर्षानंतर या मुलांच्या नोकरीचं काय?’- उद्धव ठाकरे

uddhav
Last Modified रविवार, 19 जून 2022 (14:07 IST)
:शिवसेना आज आपला 56 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मला उद्याच्या निवडणुकीची चिंता नाही, हारजीत होत असते. उद्या जिंकणारच आहोत. राज्यसभेत एकही मत फुटलं नाही. कोणी काय कलाकारी केली मला माहित आहे. फुटलं कोण त्यात अंदाज लावला आहे. त्याचा हळूहळू उलगडा होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ते विधान परिषद निवडणूक आणि केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविषयी बोलले आहेत.

ते म्हणाले, "मी रावते आणि देसाई यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली नाही. पण त्यांच्यात धूसपूस नाही. हा खरा शिवसैनिक. निवडणूक म्हटलं की आमदारांची बडदास्त ठेवावी लागते.

"उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडणार नाही हे दाखवणारी. सत्तेपुढे शहाणपण आणि माज चालणार नाही."
"आता शिवसेनेत गद्दार मनाचा कोणीच नाही. आत हिंदुत्वाचे डंके पिटत आहेत. गर्व से कहो हम हिंदु है अशी घोषणा होती. पण हिंदु हा शब्द कोणी उच्चारत नव्हतं," असं ते पुढे म्हणाले.

अग्निपथ योजनेवर टीका
यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरही टीका केली.

ते म्हणाले, "अग्निपथ विरोधात तरूण रस्त्यावर उतरले आहेत, त्यांची माथी कोणी भडकवली? हातामध्ये काम नसेल तर रामराम करून काही फायदा नाही. आता परत काही टूमणं काढलंय. वचनं अशी द्या जी पूर्ण करता येतील. नोकऱ्या देऊ म्हणाले पण दिल्या नाहीत. मोठी घोषणा फक्त केली अग्निवीर. तीन-चार वर्षानंतर या मुलांच्या नोकरीचं काय?
"ऐन उमेदीत त्यांना मृगजळ दाखवणार पण सर्वात सर्वात गंभीर आहे भाडोत्री सैन्य. उगाच स्वप्न दाखवू नका. लोकांच्या जीवाशी खेळू नका. मग ते का नाही भडकणार. मुलांना यामागे का धाववताय. ही मुलं पुढे अंगावर आली तर झेलणार कोण?"

:


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, आजचे दर जाणून घ्या

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, आजचे दर जाणून घ्या
Gold Silver Price Today: सोन्याचे दर दररोज सतत वाढत आहेत आणि कमी होत आहेत. आज म्हणजेच 17 ...

Jill Biden Covid Positive: अमेरिकेतील फर्स्ट लेडी जिल ...

Jill Biden Covid Positive: अमेरिकेतील फर्स्ट लेडी जिल बायडेनला कोरोनाची लागण
अमेरिकेतील फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. व्हाईट हाऊसने म्हटले आहे ...

रोहिंग्या शरणार्थियांवर निर्णय : लवकरच दिल्लीतील सर्व ...

रोहिंग्या शरणार्थियांवर निर्णय : लवकरच दिल्लीतील सर्व रोहिंग्या शरणार्थियांना राहण्यासाठी घरे मिळणार
लवकरच दिल्लीतील सर्व रोहिंग्या शरणार्थियांना राहण्यासाठी घरे मिळणार. तंबूत राहणार्‍या ...

Maharashtra Monsoon Assembly :महाराष्ट्र पावसाळी ...

Maharashtra Monsoon Assembly :महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची शिंदे सरकार कोसळण्याची घोषणाबाजी
आज पासून महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सामूहिक राष्ट्रगीताने सुरु झाले असून पाहिल्याची ...

National Anthem :राज्यात आज 11 वाजता 'सामूहिक राष्ट्रगीत ...

National Anthem :राज्यात आज 11  वाजता 'सामूहिक राष्ट्रगीत गायन' उपक्रमात सहभाग घेण्याचं नागरिकांना आवाहन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात 17 ऑगस्ट 2022 ला सकाळी 11 ते ...