रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (16:40 IST)

सत्तेसाठी शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाली असावी :दरेकर

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडल्यामुळे केवळ सत्तेसाठी या प्रकरणांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. सत्तेसाठी शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाली असावी”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 
 
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.