1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (22:31 IST)

‘फटे लेकीन हटे नही’हे शिवसेनेचं धोरण

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मधल्या काळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चाही झाली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या भेटीबाबत अधिक माहिती दिली आहे. आपण राहुल गांधी यांना शिवसेना म्हणजे काय? शिवसेना नेमकी कशी काम करते? याबाबत एका वाक्यात सांगितल्याचं राऊतांनी म्हटलंय. ‘फटे लेकीन हटे नही’ हे शिवसेनेचं धोरण असल्याचं आपण राहुल गांधींना सांगितल्याचं राऊत म्हणाले. त्यावेळी उपस्थितांमध्येही एकच हशा पिकला. 
 
‘मध्यंतरी माझी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. या भेटीची खूप चर्चा झाली. राहुल गांधी यांनी शिवसेनेच्या रचनेविषयी कार्याविषयी समजून घेतलं. त्यांनी मला एका वाक्यात शिवसेना काय आहे, असं विचारलं. त्याला उत्तर म्हणून आम्ही असे आहोत की एकदा रस्त्यावर उतरलो की विचार करत नाही. ‘फटे लेकीन हटे नही’ असं आमचं असतं. आम्ही कुणाच्या पाठीत वार करत नाही,” असं राऊत म्हणाले. तसंच शिवसेना असंख्य वार आणि घाव घेऊन इथपर्यंत आली आहे. ही शिवसेना त्यागातून संघर्षातून समोर आलेली आहे. जी आंदोलनं आपण केली त्याच पुण्याईवर आज शिवसेना उभी असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.